Sanjay Raut Complaint to CBI: संजय राऊत आक्रमक, सीबीआयकडे 500 कोटी रुपये घोटाळ्याची तक्रार ; भीमा पाटस साखर कारखाना प्रकरण
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Sanjay Raut Complaint to CBI: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सीबीआयकडे (CBI) तक्रार तब्बल 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार नोंदवली असल्याचे समजते. संजय राऊत यांनी केलेली तक्रार भीमा पाटस साखर कारखाना (Bhima Patas Sugar Factory) कथीत भ्रष्टाचार प्रकरणात असल्याची माहिती आहे. हा कारखाना भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या मालकी आहे. या प्रकरणात संजय राऊत यांनी या आधीही प्रसारमाध्यमांकडे जाहीर तक्रार केली होती आणि माहितीही दिली होती.

मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांनी सीबीआकडे केलेल्या तक्रारीत भीमा पाटस साखर कारखाण्यासंदर्भात अनेक आरोप केले आहेत. यात प्रामुख्याने, मनी लॉन्ड्रींग, काळा पैसा, आदी आरोपांचा समावश आहे. संजय राऊत यांचा आरोप आहे की, भीमा पाटस साखर कारखान्याच्या खात्यावर असलेले 500 कोटी रुपये हे कारखान्याशिवाय इतर कामांसाठीच वापरण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. (हेही वाचा, Sanjay Raut On Maharashtra Govt: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार येत्या 15 ते 20 दिवसांत कोसळणार; संजय राऊत यांच भाकित)

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भीमा पाटस साखर कारखान्यासंदर्भात या आधीही अनेक आरोप केले आहेत. तसेच, राज्याच्ये विद्यमान उपमुख्यमंंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एक पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. गृहमंत्र्यांनी तक्रारीचे पत्र देऊनही कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने आपण सीबीआयकडे चौकशीसाठी तक्रार नोंदविल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आपण सीबीआयला केलेल्या तक्रारीत आपल्याकडी सर्व पुरावे सादर केले आहेत.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भीमा पाटस कारखाना एक उदाहरण आहे. या कारखान्यासह सुमरे 17 कारखान्यांची अशीच प्रकरणे आपल्याकडे आहेत. भीमा पाटस कारखाना हा त्यापैकीच एक आहे.