Mumbai Accident:  रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा अपघात, आयशर ट्रकची धडक
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Accident: रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बड्या नेत्याच्या कारचा अपघात झाला आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघात मुंबई कुर्ला मार्गावर झाली. (हेही वाचा-  नाशिकमध्ये अग्नितांडव! घराला आणि गोदामाला भीषण आग; 50 दुचाकी जळून खाक)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना  ठाकरे गटाचे रायगड लोकसभा  मतदारसंघ समन्वयक संजय कदम हे कारने मुंबई कुर्ला मार्गाने जात होते. त्यावेळी मागून एका आयशर ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अपघात घडून आला. कारचा मागून चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस अपघातस्थळी दाखल झाल्यानंतर आयशर ट्रक चालकाला ताब्यात घेतले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, संजय कदम हे प्रचार सभा संपवून मुंबईच्या दिशेने परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. गाडीचे संपुर्ण नुकसान झाले आहे. संजय कदम आणि त्यांच्यासोबत असलेले अन्य व्यक्ती यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी वाहतुक सेवा सुरळीत केली. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु केली आहे.