सांगली: आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्यासह कुटुंबातील तिघांना Coronavirus संसर्ग
NCP MLA Suman Patil | (File Photo)

राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील (RR Patil) याच्या पत्नी, तासगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सुमन पाटील (NCP MLA Suman Patil) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. सुमन पाटील यांच्यासह दीर सुरेश पाटील आणि त्यांचा मुलगा रोहित पाटीलअसा तिघांचाही कोरोना व्हायरस अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिघांनाही सांगली (Sangli) येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला हालवण्यात आले आहे.

दरम्यान, आपली प्रकृती सध्या उत्तम आहे. मात्र आपल्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांनी स्वत:हून क्वारंटाईन व्हावे. तसेच, कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी, असे अवाहन आमदार सुमन पाटील यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यातल कोरोना व्हायरस संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहिती अशी की, आटपाडी-खानापूर मतदार संघाचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. सांगली पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांचीही कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. (हेही वाचा,Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 20,489 नवे कोरोना रुग्ण, 312 मृत्यु, 10,801 जणांंना डिस्चार्ज, जाणुन घ्या एकुण रुग्णसंख्या )

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्येही कोरोना व्हायरस प्रादुर्भावाची संख्या वाढते आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्गाबाबत एकूणच नागरिकांमध्ये भीतचे वातावरण तयार झाले आहे.

आज (5 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील कोरोना व्हायरस संक्रिमीत एकूण रुग्णांची संख्या १६ हजार ४०० वर पोहोचली. आज दिवसभारत जिल्ह्यात 612 कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 633 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजवरच्या जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संखेत आजचा आकडा सर्वोच्च आहे.