Atpadi Gang Rape: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Rape | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Sangli Gang Rape: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Atpadi Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. ही घटना आटपाडी शहर परिसरात घडली. बबन बेरड काळे, रवी बेरड काळे, बबलू पपलू शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपींना पीडित मुलीच्या चुलतीनेच सहकार्य केल्याचा आरोप आहे. सर्व आरोपी मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर गावचे रहिवासी आहेत. पीडितेस आणि तिच्या चुलत्यास दाद न देणाऱ्या पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांच्या आदेशावरुन आटपाडी पोलीस स्टेशन (Atpadi Police Station) दप्तरी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, पीडित मुलीच्या आई-वडीलांचा तिच्या लहानपणीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे पीडित मुलगी ही आपल्या चुलत्यांसोबत आटपाडी येथे राहते. गेले 12 वर्षे पीडिता ही आपल्या चुलत्यांसोबत राहते. दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी (26 ऑगस्ट 2020) पीडितेचे चुलते काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. पीडिता घरात झोपली होती. या वेळी दरम्यान, आरोपी दुपारी 12 वाजणेच्या सुमारास पीडितेच्या घरी दुचाकीवरुन आले. या वेळी त्यांनी मद्यसेवन केले होते.

दरम्यान, आरोपींनी दारुच्या नशेत पीडितेला उचलून दुसऱ्या खोलीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे आरोप आहे की, या घटनेसाठी आरोपींना पीडितेच्या चुलतीनेच मदत केली. घटना घडल्यानंतर घडल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगू नको असेही, आरोपींनी पिडितेला धमकावले. चुलते घरी आल्यानंतर पीडितेने घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. (हेही वाचा, बिहार: आईवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार, मुलाच्या डोक्याला पिस्तूल लावून नराधमांचे कृत्य, व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, पीडितेचे चुलते पीडितेसोबत आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नका दिला. त्यामुळे पीडितेच्या चुलत्यांनी ॲड. विलास फाळके यांच्या मदतीने सत्र न्यायालयात तक्रार दिली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. पीडितेचा जबाब नोंदवून घेत पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, घडल्या प्रकाराचा परिसरात चर्चा सुरु आहे.