Rescue Operations in Sangli: आठवड्याभरापासून महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्या आणि धरणांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने या शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. या भागामध्ये आज (10 ऑगस्ट) सलग सहाव्या दिवशी पूरामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मात्र स्थानिक आणि राज्य, केंद्र सरकार पूरग्रस्तांना वेळीच मदत मिळावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यामध्ये आजही एनडीआरआफची अतिरिक्त पथकं कोल्हापूर, सांगली शहरामध्ये पोहचली आहेत. आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीमध्ये पोहचणार आहेत. सांगलीतील हवाई पाहणी केल्यानंतर आज ते पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. Maharahstra Monsoon 2019: पूरग्रस्तांना दिलासा; मुंबई, महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार
कोल्हापूर, सांगली, सातारा भागामध्ये पावसाचा जोर मंदावल्याने आता मदत कार्याला वेग आला आहे. देशा- परदेशातून सामान्य महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत पुढे करत आहेत. कोल्हापूर आणि सांगली भागात पावसाचं पाणी कमी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सुमारे 2 लाखाहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यश आले आहे. Maharashtra Flood: महाराष्ट्र्र पूरग्रस्तांच्या मदतीला धावले बारामतीकर, शरद पवार यांच्या आव्हानावर एका तासात उभारली एक कोटीची मदत
ANI Tweet
Maharashtra: National Disaster Response Force (NDRF) continues rescue operations in Sangli. #maharashtrafloods pic.twitter.com/khJCho9YlB
— ANI (@ANI) August 10, 2019
कोल्हापूर, सांगली भागात पाऊस थांबला असला तरीही पूर ओसरण्यास अद्याप काही काळ वाट पहावी लागेल असं सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीही दोन दिवसांपूर्वी या भागाची हवाई पाहणी करून पूरग्रस्तांनी घाबरून निर्णय घेणं टाळावं असं आवाहन केले आहे. अद्याप पूरस्थिती गंभीर असलेल्या भागामध्ये वीज बंद करण्यात आली आहे. पूरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करून शासनाकडून मदत पुरवली जाईल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.