Sangli District Bank Election Result: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपला धक्का, महाविकासआघाडीचा दणदणीत विजय
Sangli District Central Co-operative Bank | (Photo Credit- Sangli dcc bank)

पश्चिम महाराष्ट्रात महाविकासआघाडी पुन्हा एकदा भाजपवर मात करताना दिसत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक (निवडणुकीत (Sangli District Bank Election) महाविकासआघाडीने दमदार कामगिरी करत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या रुपात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांना 17 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपच्या वाट्याला केवळ 04 जागा आल्या आहेत. उल्लेखनिय म्हणजे या निवडणुकीत आमदार विक्रम सावंत (MLA Vikram Sawant) यांचा पराभव झाला आहे. विक्रम सावंत हे मंत्री विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांचे मावस भाऊ आहेत. सावंत हे जत सोसायटी गटातून उमेदवारी करत होते.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक पक्षनिहाय निकाल

  • राष्ट्रवादी 9
  • काॅंग्रेस 5
  • शिवसेना 3
  • भाजप 4

पॅनलनिहाय निकाल

महाविकासआघाडी- सहकार पॅनेल- 17 जागा

भाजप- शेतकरी पॅनेल- 4 जागा

(हेही वाचा, Satara District Bank Election Result: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक, शशिकांत शिंदे यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी)

सांगली जिल्हा बँकेसाठी एकूण 21 जागांसाठी लढत झाली. त्यापैकी 03 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यामुळे उर्वरीत 18 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी बँकेच्या संस्था आणि व्यक्तिगत अशा एकूण 2573 पैकी 2195 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 18 जागांसाठी एकूण 46 उमेदवार रिंगणात होते.