Sangali Miraj Crime: धारधार शस्त्राने सपासप वार, बायकोच्या हल्ल्यात नवरा ठार; सांगली येथील मिरज शहरातील घटना
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Husband Wife Relationship: पती पत्नीचा वाद (Husband Wife Quarrel) विकोपाला जाऊन एकमेकांवर झालेल्या हल्ल्यात पती ठार झाला आहे. ही घटना सांगलि जिल्ह्यातील ( Sangli Crime News) मिरज तालुक्यातील (Miraj Crime News) एरंडोली (Erandoli) येथे घाडली. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने घटास्थळावरुन पोबारा केला आहे. सध्या ती फरार असून पोलीस तिच्या मागावर आहेत. धक्कादायक म्हणजे एकाच दिवसामध्ये हत्येच्या सलग दोन घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पती पत्नीमध्ये वादालाही विशेष असे ठोस कारण नसल्याचे पुढे आले आहे. पती-पत्नीतील किरकोळ भांडणाचे रुपांत पुढे मोठ्या वादात झाले. त्यातूनच हा हल्ला झाला. एकाच वेळी धारधार शस्त्रने अधिक वार केल्याने आणि हे वार वर्मी लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

सुभेदार काळे असे पतीचे तर चांदणी काळे असे पत्नीचे नाव आहे. दोघेही पारधी वस्तीवर राहतात. दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक करत असताना सुभेदार आणि चांदणी यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यात सुभेदार काळे याने चांदणीला शिवागाळ केली. चांदणी आणि सुभेदार यांच्यात होणारी भांडणे नित्याची होती. त्यामुळे चांदणीही सुभेदारच्या सततच्या भांडणे, शिवीगाळ आणि मारहाणीला तशीच प्रतिक्रिा देत होती. दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशीही सुभेदार चांदणीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून गेला. दरम्यान, चांदणी हिणे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या धारधार वस्तूने पती सुभेदार याच्यावर जोरदार वार केले. सपासप झालेल्या वारांतील काही वार सुभेदारच्या वर्मी लागले. त्यातच त्याने प्राण सोडले. सुभेदार याचे वय 45 वर्षे आहे. (हेही वाचा, Sangli: भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केली जबर मारहाण; 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)

सुभेदार काळे याची पत्नीकडूनच हत्या झाल्याचे समजताच अवघ्या परधी वस्तीवर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनाही समजली. त्यानंतर मिरज ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी सुभेदार काळे याचा मृतदेह ताब्यात गेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, चांदणी काळे पसार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.