उदयनराजेंचा पराभव म्हणजे आमचा पराभव – छत्रपती संभाजीराजे भोसले
Photo Credit - Facebook

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांचा पराभव झाला. तर राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. उदयनराजे यांच्या पराभवानंतर कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosle) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘छत्रपती उदयनराजे यांचा पराभव म्हणजे आमचा पराभव आहे. त्यांच्या पराभवामुळे आम्हाला दु:ख झालं आहे. सुख-दु:ख पाहण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे. आजचा पराजय हा उद्याच विजय कसा असेल? याचा उदयनराजे विचार करत असतील. कोणतं पद मिळो न मिळो पंरतु, ‘छत्रपतीं’ची पदवी महत्त्वाची आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणं, ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे’, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - राष्ट्रवादीने आमचे एकही काम केले नाही- खा. उदयनराजे भोसले; अमोल कोल्हे यांचाही मनधरणीचा प्रयत्न निष्फळ

साताऱ्यातील नवीन आमदारांना गावाचा विकास करायचा असेल तर त्यांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्या. त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा. केवळ शिवाजी महाराजांचा जयजयकार करून काही होणार नाही, असा सल्लाही संभाजीराजे यांनी दिला. तसेच नवनिर्वाचित मुख्यमंत्र्याने वर्षांतून एकदा तरी रायगडावर कॅबिनेट मिटिंग घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा - उदयनराजे भोसले यांची 'मिशी'ची भीती खरी ठरली, विजयानंतर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया

5 महिन्यांपूर्वीच निवडून आलेल्या उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक चर्चेत होती. शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. उदयनराजे यांचा पराभव भाजपसाठी धक्का देणारा तर राष्ट्रवादीसाठी दिलासा देणारा ठरला. ‘जिंकलो नाही पण संपलो ही नाही’, अशा आशयाचं ट्विट करत उदयनराजे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. उदयनराजेंसोबतच विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.