उदयनराजे भोसले यांची 'मिशी'ची भीती खरी ठरली, विजयानंतर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया
Udayan Raje Bhosale, Shriniwas Patil | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Satara By-election Result 2019: भाजप (BJP) उमेदवार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांना वाटणारी मिशीची (Mustache) भीती अखेर खरी ठरली, अशी मिश्कील प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, शरद पवारांना दगा दिल्यानेच उदयनराजेंचा पराभव झाला, असेही श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक निकालाकडे राज्याचे आणि केंद्राचेही लक्ष लागले होते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती.

मिशीवाल्या उमेदवाराची आपल्याला भीती वाटते असे एकदा विनोदाने उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही एकदा जाहीर सभेत बोलताना उदयनराजे मिशीवाल्या उमेदवाराला खाबरतात अशा आशयाचे विधान केले होते. मुख्यमंत्र्यांनीही हे विधान विनोदाने केले होते. मात्र, आता खरोखरच उदयनराजे भोसले पराभूत झाल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरला? दमदार सभा झालेल्या ठिकाणी भाजप उमेदवार पराभूत)

दरम्यान, शरद पवार हे उद्या (25 ऑक्टोबर) साताऱ्यात येत आहेत. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली होती. सातारा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना प्रमाण माणनारा जिल्हा आहे. यशवंतरावांचे विचार शरद पवार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळेच साताराच्या जनतेने पुन्हा एकदा शरद पवार यांना साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि साताऱ्याची जनता यांच्यामुळेच आपला विजय निश्चित झाल्याचेही श्रीनिवास पाटील यांनी या वेळी सांगितले.