Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credit - Social Media)

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या भूमिकेबाबत लागून राहिलेली उत्सुकता अखेर संपली आहे. संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election 2022) लढणार नाहीत.  आयोजित  पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपण अपक्ष निवडणूक लढविणार होतो. मात्र, घोडेबाजार रोखण्यासाठी आपण ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले. यापूढे राज्य हे आपले लक्ष्य असेल. जनता हीच माझी ताकद आहे. त्यासाठी उद्यापासूनच महाराष्ट्रभर दौरे करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. स्वराज्य संघटनेचा (Swarajya Sanghatana) विस्तार राज्यभर वाढवणार असा संकल्पही त्यांनी या वेळी बोलून दाखवला.

संभाजीराजे छत्रपती यांनी पुढे बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शब्द दिला होता. परंतू, तो शब्द त्यांनी पाळला नाही. आपण सुरुवातीपासूनच ठाम होतो की कोणत्याही पक्षात अडकायचे नाही. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी ऑफर होती. मात्र आपण निर्णयावर ठाम राहिलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे दोन खासदार मला भेटले. ऑबेराय हॉटेलमध्ये बैठक झाली. यावेळी ते म्हणाले राजे आम्ही लगेचच आपली उमेदवारी जाहीर करतो. मात्र, आपण शिवसेनेत या शिवबंधन बांधा. मुख्यमंत्र्यांचीही हीच अपेक्षा आहे. परंतू, आपण अपक्षच निवडणूक लढवणार असल्याचे आपण त्यांना सांगितल्याचे राजेंनी म्हटले.

ट्विट

ट्विट

कोणत्याही पक्षाबद्दल आपल्याला द्वेश नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस, भाजपा असो. प्रत्येक पक्षाची आपली भूमिका असते. स्ट्रॅटीजी असते. त्यानुसार ते चालतात. त्यामुळे त्याबद्दल आता मला काही म्हणायचे नाही. आता आपली ताकद केवळ 42 आमदार असणार नाही. आपली ताकद ही जनता आहे. आता महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना विस्तारासाठी काम करेन असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.