महाराष्ट्र: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक जेजुरी गडावर गेलेल्या संभाजीराजे भोसले यांनी उचचली खंडा तलवार, व्हिडिओ व्हायरल
SambhajiRaje Bhosle at Jejuri (Photo Credits: Facebook)

कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosle) आज सपत्नीक जेजुरी (Jejuri) गडावर पोहोचले. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संभाजीराजे यांनी आपल्या पत्नीसह खंडोबाचे दर्शन घेतले. संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात पौंष पोर्णिमा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली. त्यामुळे संभाजी राजे यांनी खंडोबाची विधिवत पूजा देखील केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाजीराजेंनी खंडा तलवार उचलली. ही तलवार उचलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

संभाजीराजे यांच्या लग्नाचा आज 25 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांनी आपली पत्नी संयोगीताराजे भोसले यांच्यासह देवदर्शनासाठी जेजुरी गडावर आले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या कुवदैवताचे दर्शन घेऊन कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकले.हेदेखील वाचा- Pali Khandoba Yatra 2021 Live Darshan: खंडोबा आणि म्हाळसा यांचा यंदाचा विवाहसोहळा इथे पहा लाईव्ह

जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्राचे प्रमुख दैवत , त्याच प्रमाणे छत्रपती घराण्याचे श्रध्दास्थान आहे.

आज युवराज संभाजीराजे आणि सौ. युवराज्ञी संयोगीताराजे यांनी श्रीक्षेत्र जेजूरीला जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी छत्रपती घराण्याच्या परंपरेनुसार विधीवत कार्यक्रम करण्यात आले.

त्याचबरोबर त्यांनी 42 किलो वजनाची खंडा तलवार देखील उचलली आहे. ही तलवार उचलण्यासाठी दरवर्षी दस-याला स्पर्धा आयोजित करण्यात येते. ही तलवार जेजुरी गडावर एका काचेच्या पेटीत ठेवलेली आहे. आज ही तलवार बाहेर काढण्यात आली. संभाजीराजे ही तलवार उचलून घेतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.