Sharad Pawar On Dilip Kumar: शरद पवार यांनी सांगितली दिलीप कुमार यांच्याबद्दलची आठवण म्हणाले 'त्यांना पाहण्यासाठी आम्ही सायकलवरुन जेजुरीला गेलो'
Sharad Pawar, Dilip Kumar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना आज (7 जुलै) उजाळा दिला. दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिलीप कुमार यांच्या अनेक आठवणी (Sharad Pawar On Dilip Kumar) सांगितल्या. दिलीप कुमार यांच्याबाबत आमच्या तरुण वयात नेहमीच आमच्या पिढीला आकर्षण राहिले होते. एकदा जेजूरी (Jejuri) येथे दिलीप कुमार यांचे शुटिंग सुरु होते. या शुटींगबाबत आम्हाला कुणकुण लागली. त्यानंतर मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी जेजूरीला गेलो, अशी आठवण पवार यांनी सांगितली. त्यावेळी आम्ही दुरुन का होईना आम्ही दिलीप कुमार यांना पाहिले.

शरद पवार यांनी सांगितले की, पुढे आम्ही देशासरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्यासी संपर्क आला. त्यावेळी दिलीप कुमार यांच्या व्यक्तिमत्वाचा जवळून परिचय झाला. हा परिचय पुढे दोस्तीमध्ये बदलला. दिलीप कुमार हे उत्कृष्ठ अभिनेते तर होतेच परंतू, एक माणूस म्हणूनही ते तितकेच ग्रेट होते, अशी आठवण पवार यांनी या वेळी सांगितली. (हेही वाचा, Dilip Kumar Passes Away: प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन; 'ट्रॅजेडी किंग' वयाच्या 98 व्या वर्षी हरपला)

दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशात अनेकांना दु:ख झाले. त्यांच्या निधनामुळे मीही व्यथित झालो आहे. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अभिनयातील महानायक गमावला. माझ्या निवडणुकीत प्रत्येक वेळी ते आवर्जून प्रचारासाठी येत असत अशी आठवणही पवार यांनी सांगितली. अभिनयासोबतच सार्वजनिक जिवनातही त्यांचा मोठा सहभाग असायचा. राजकारणातही ते सहभागी होते. त्यामुळे त्यांना मुंबईचे शेरीफ करण्यात आले होते. शेरीफ म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. खास करुन भारत चीन युद्ध, भारत-पाक युद्ध अशा घटनांनंतर जवानांचा उत्साह वाढविण्यासठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले, अशा भावना शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबत व्यक्त केल्या.

दिलीप कुमार यांच्या लोकप्रियतेबद्दल आम्हाला साऊत ईस्टमध्ये आली. आम्ही साऊथ इस्ट देशांमध्ये गेलो होतो. तेव्हा आमच्यासोबत दिलीप कुमारसुद्धा होते. त्या वेळी इजिप्तमधील नागरिकांनी दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. म्हणजे ते केवळ भारतातच नव्हे तरी विदेशातही लोकप्रिय होते. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. अलिकडेच मी त्यांना भेटून आलो होतो, असे शरद पवार म्हणाले.