Dilip Kumar Passes Away: प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन; 'ट्रॅजेडी किंग' वयाच्या 98 व्या वर्षी हरपला
Dilip Kumar | (Photo Credit : Twitter)

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन (Dilip Kumar Passes Away) झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. मंबई येथील हिंदूजा रुग्णालयात ( PD Hinduja Hospital) बुधवारी (7 जुलै) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणामुळे पाठीमागी प्रदीर्घ दिलीप कुमार (Dilip Kumar) वैद्यकीय उपचार घेत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. परंतू, अखेर त्यांचे निधन झाले. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. पार्कर (Dr. Jalil Parkar) यांनी याबाबतची घोषणा केली. डॉ. पारकर हे त्यांच्यावर गेली प्रदीर्घ काळ उपचार करत होते. दिलीप कुमार यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात मुशाफीरी केली. त्यांना 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखले जात असे.

दिलीप कुमार यांना पाठिमागील एका महिन्यात दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच जुलै रोजी दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरुन त्यांच्या आरोग्याबबत अद्ययावत माहिती देण्यात आली होती.दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांच्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीत म्हटले होते की, दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सध्या ते रुग्णालयातच आहेत. परंतू आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करा. दरम्यान, प्रकृती सुधारत असल्याचे वृत्त असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली.

दिलीप कुमार यांचा जन्म 1 डिसेंबर 1922 मध्ये ब्रिटीशकालीन भारतात आणि आजच्या पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. दिलीप कुमार यांचे खरे नाव युसुफ खान होते. त्यांनी आपले शिक्षण नाशिक येथील देवळाली येथे केले. राज कपुर हे त्यांचे बालपणीचे मित्र होते. तेव्हापासूनच दिलीपकुमार यांची बॉलिवूडची सफर सुरु झाली होती. सुमारे 22 वर्षांचे असतानाच दिलीप कुमार यांना पहिला चित्रपट मिळाला. 1944 मध्ये त्यांनी 'ज्वार भाटा' चित्रपटात काम केले. परंतू त्या वेळी त्यांच्या चित्रपटाची विशेष चर्चा झाली नाही.

एएनआय ट्विट

दिलीप कुमार यांनी जुवळपास पाच दशके केलेल्या करीअरमध्ये 60 पेक्षाही अधिक चित्रपट केले. त्यांनी आपल्या चित्रपट करीअरमध्ये अनेक चित्रपट नाकारले. कारण त्यांचे असे म्हणने होते की चित्रपट कमी असतील तरी चालतील पण ते चांगले असायला हवेत. प्यासा, दीवार यांसारख्या चित्रपटात काम करु शकले नाहीत याबाबत त्यांना कायम खंत होती.