Khandoba Mhalsa Vivah Celebration 2021: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (25 जानेवारी) सातार्यातील पाली (Pali) येथील खंडोबा यात्रा (Khandoba Yatra)भाविकांशिवाय साधेपणाने साजरी होणार आहे. यंदा भाविकांशिवाय ही यात्रा होणार असली तरीही प्रमुख मानकरी यांच्या हस्ते या यात्रेचे सारे विधी, सोहळे आणि रीती रिवाजांप्रमाणे होणारे सोहळे पार पडणार आहेत. दरवर्षी पौष महिन्यात मोठ्या उत्साहात पाली येथील खंडोबा यात्रा रंगते. यामध्ये खंडोबा (Khandoba) आणि म्हाळसा (Mhalsa) यांचा विवाह सोहळा हा देखील मोठा आकर्षणाचा विषय असतो. यंदा हा सोहळा तुम्हांला थेट यात्रेमध्ये सहभागी होऊन पाहता येत नसली तरिही ऑनलाईन हा सोहळा उपलब्ध करण्यात आला आहे. युट्युब वर हा सोहळा पाहता येईल.
खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी पाहता यंदा मंदिर या काळात बंद ठेवण्यात आले आहे. तसेच नागरिकांना, परजिल्ह्यातील मानकर्यांना, कोल्हापूर येथील चोपदार यांचा घोडा यांना देखील प्रवेशबंदी असेल. त्यामुळे सध्या एरवी दुमदुमणार्या खंडोब नगरीत शुकशुकाट आहे. Jejuri Somvati Amavasya Yatra 2020: कोरोना व्हायरसमुळे जेजुरी येथे 20 जुलै रोजी होणारी खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द.
खंडोबा आणि म्हाळसा विवाहसोहळा 2021 इथे पहा लाईव्ह
दरम्यान आज दुपारी 1 वाजल्यापासून युट्युबच्या माध्यमातून भाविकांना खंडोबा आणि म्हाळसा यांच्या विवाह सोहळ्याची क्षणचित्रं पाहता येणार आहेत. दरवर्षी पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडेराया आणि म्हाळसा देवीच्या लग्नाचा सोहळा साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रासोबत कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथूनही नागरिक हमखास उपस्थिती लावतात.