साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेला अखेर 8 महिन्यांनी न्याय मिळाला आहे. न्यायालयाने 45 वर्षीय आरोपीला दोषी ठरवले आहे. त्याला येत्या बुधवारी (1 जून) शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. पाठिमागच्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी अवघ्या राज्याला हादरवून टाकणारी ही घटना साकीनाका येथील खैरानी रोडवर घडली होती. पोलिसांनी या घटनेचा 18 दिवसांमध्ये तपास पूर्ण करुन अहवाल दिला होता. तसेच, आरोपीवर गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणात राज्यासरकारने देखील स्पष्ट केले होते की महिलांवरील गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. राज्य सरकारने हे प्रकरण जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. राजा ठाकरे आणि महेश मुळे यांनी या प्रकरणात 30 पेक्षा अधिक साक्षीदार तपासले. त्यांचे जबाब घेतले.
साकीनाका बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहान याला या गुन्हात कमीत कमी शिक्षा म्हणून जन्मठेप तर जास्तीत जास्ता शिक्षा म्हणजे फाशी होऊ शकते. महिला अनुसूचित जातीची असल्याची माहिती असल्याने चौहान यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याचाही आरोप ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 32 वर्षंची महिलाल घटना घडली साधारण पहाटे तीन वाजता भेटली होती. आरोपीच्या मागणीला पीडितेने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर आरोपी आणि पीडिता यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादानंतर अधिकच चिडलेल्या आरोपीने तिला पार्किंगमध्ये उभा असलेल्या टेम्पोमध्ये नेले आणि तिच्यावर शारीरीक, मानसिक अत्याचा केले. चिडलेल्या आरोपीने बलात्कार झाल्यावर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकला. त्यानंतर तिला रक्तबंबळ अवस्थेत सोडून पळ काढला. (हेही वाचा, Rape: बंदुकीचा धाक दाखवून 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, प्रतिकार केल्याने तरूणीवर हल्ला, आरोपी अटकेत)
दरम्यान, पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. उपचार सुरु असाताना 11 सप्टेंबर रोजी तिला मृत घोषणीतत करण्यात आले.