वैफल्यग्रस्त मनसे वर उपचारांची गरज; राज ठाकरेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला Sanjay Raut यांचं उत्तर
Sanjay Raut On Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज पुण्यातील त्यांच्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकार वर आणि प्रामुख्याने शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) टीका केली आहे. राज ठाकरेंच्या शिवसेनेवरील टीकेला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे हा वैफल्यग्रस्त आहे त्यांना उपचारांची गरज असल्याची बोचरी टीका केली आहे.

शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर टीका करणार्‍या मनसे चं कुठून आणि कधी आलं हिंदुत्त्व? असा सवालही त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात भाजपाचा पाठिंबा असलेल्या आणि यूपीत भाजपाचीच सत्ता असूनही तुम्ही अयोद्दा दौरा कसा करू शकत नाही? खासदाराने माफी मागितली असेल तर तुम्हांला तुमची भूमिका घेता आली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Raj Thackeray Pune Rally: अयोद्धा दौर्‍याला विरोधाची रसद महाराष्ट्रातून; राज ठाकरेंचा मोठा आरोप.

संभाजीनगर नामांतराचा मुद्दा केंद्र सरकार कडे आहे आणि ते त्याचा निर्णय घेतील तसेच औरंगजेबाच्या कबरेचा विषय देखील केंद्राच्या पुरात्तव विभागाकडे असल्याने त्यावर राज्य सरकार काही करू शकत नाही.

दरम्यान एकीकडे राणा दाम्पत्याला फैलावर घ्यायचं आणि लडाखमध्ये त्यांच्याच खांद्या वर ठेवत त्यांच्यासोबत एकत्र बसून जेवायचं हा दुटप्पी पणा कसा होऊ शकतो यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. लडाखचा दौरा हा शासकीय होता. पण एवढही ज्यांना कळत नाही त्यांनी राजकारण सोडण्याचा सल्ला राऊतांनी दिला आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेवर बोलूच नये असे देखील ते म्हणाले आहेत.