Raj Thackeray Pune Rally: अयोद्धा दौर्‍याला विरोधाची रसद महाराष्ट्रातून; राज ठाकरेंचा मोठा आरोप
राज ठाकरे । PC: Twitter/ANI

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोद्धा दौरा तूर्तास स्थगित या ट्वीट नंतर अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याला आज राज ठाकरे यांनी सभेत उत्तर देताना त्यांच्या अयोद्धा दौर्‍याला विरोधाची रसद महाराष्ट्रातूनच पोहचवल्याचा मोठा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांवर हकनाक केसेस घालून निवडणूकींपासून दूर ठेवण्याचा सापळा होता असे ते म्हणाले आहेत. पण कार्यकर्ते गमावण्या पेक्षा टीका सहन करणं पसंत करेल असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

खासदार बृजभूषण सिंग यांना आता 12 वर्षांनंतर माफीची आठवण कशी होते? एक खासदार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरोधात कसा काय बोलू शकतो अशीही शंका राज यांनी उपस्थित केली. 'ज्यांना माझ्या अयोद्धा दौर्‍याची तारीख खुपली त्यांनीच सापळा रचल्याचे' राज ठाकरे म्हणाले आहेत. तर आंदोलनं अर्धवट सोडत असल्याच्या आरोपाचाही त्यांनी यावेळी समाचार घेत एकही अर्धवट सोडलेलं आंदोलन दाखवा असं ते म्हणाले आहेत. MNS कडून लालबाग परिसरात पोस्टरबाजी; 'राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल'.

राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका करताना खरं खोटं हिंदुत्त्व काय असतं? असा सवाल विचारला आहे. इथे हिंदुंना निकाल हवे आहेत. अयोद्धा दौर्‍यात जसा राम लल्लांचं दर्शन घ्यायचं होतं तसेच मारलेल्या कारसेवकांसाठीदेखील आपण अयोद्धेला जाणार होतो असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी आज पायाच्या दुखण्यामुळे कंबरेला त्रास होत असल्याने 1 जून 2022 दिवशी हीप बोनचं ऑपरेशन होणार असल्याचं सांगितलं आहे. यानंतर दीड-दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा समोर येईल असं राज ठाकरे म्हणाले आहेत मात्र तो पर्यंत भोंग्याच्या आंदोलनाला कायम ठेवा असा सल्लादेखील राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 3 महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत ज्यामध्ये देशात समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा करावा आणि औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावंं.