Sailor Dies Due To Snake Bite: पालघरमधील माहीम येथील खलाशाचा सर्पदंशाने मृत्यू; गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना
Snake (PC -Pixabay)

Sailor Dies Due To Snake Bite: पालघर (Palghar) तालुक्यातील माहीम (Mahim) येथे मासेमारी करणाऱ्या नौकेतील खलाशाचा साप चावल्याने (Snake Bite) मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यात सर्पदंशामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची अलीकडच्या काळातील ही तिसरी घटना आहे. पालघरमधील वडराई गावात मासेमारीच्या बोटीवर काम करणारा बिरजू मंडल (वय, 30) 17 सप्टेंबर रोजी अज्ञात किटक चावल्याची तक्रार घेऊन माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) आला होता. रुग्णाला वाटले की, त्याला उंदीर चावला आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाचे महत्वाचे पॅरामीटर्स खराब होते आणि त्याची प्रकृती खालावली होती. अँटी व्हेनम इंजेक्‍शनचे उपचार सुरू झाले. मात्र रुग्णाची प्रकृती खालावल्याने रुग्णाला पालघर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Mumbai: मुंबईतील चांदिवलीत भरधाव दुचाकी कारला धडकल्याने दोन जखमी; 3 दिवसात दुसरी घटना, Watch Video)

फ्री प्रेस जर्नलने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तनवीर शेख यांच्याशी या घटनेसंदर्भात संपर्क साधला असता डॉ. शेख म्हणाले की, सर्पदंश झाल्यानंतर बराच कालावधीनंतर रुग्ण पीएचसीमध्ये पोहोचला. विषारी साप चावल्याने रुग्णाचा जीव वाचवता आला नाही. (हेही वाचा - Parbhani Crime News: भांडण झाल्याने पहिल्या पत्नीसह पतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून, परभणी हादरली)

दरम्यान, पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांना गेल्या महिन्यात विषारी साप चावला होता, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंजाबच्या पुरासाठी बचाव कार्यात सहभागी झाल्यानंतर बैंस यांना सर्पदंश झाला होता. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पायाला झालेल्या सर्पदंशाचा फोटो पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली होती.