Parbhani Crime News: भांडण झाल्याने पहिल्या पत्नीसह पतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून, परभणी हादरली
Crime (PC- File Image)

Parbhani Crime News:   परभणीत मोठी खळबल जनक घटना घडली आहे. पहिल्या पत्नीसोबत मिळून दुसऱ्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दररोजच्या वादाला कंटाळून पतीने आपल्या दुसऱ्या पत्नीचा जीव घेतला. मृतदेह दोघांनी कालव्यात फेकला. या घटनेची माहिती मिळताच, पोलीसांनी दोन्ही आरोपीला 12 तासांत अटक केली आहे. परभणी शहरातील नांदखेडा परिसरातील ही घटना आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील नांदखेडा परिसरात एका कालव्यात मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलीसांनी या मृतदेहाचा तपास सुरु केला. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतल्याने उत्तरीय तपासणीत महिलेचा खून करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचे उघड झाले. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी शहरातील नांदखेडा रोड परिसरातील एका कालव्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, उत्तरीय तपासणीत महिलेचा खून करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचे उघड झाले. ही महिला परभणी शहरातील नेहरुनगर परिसरात राहण्यास असून तिचे नाव हे शिल्पा नामदेव दुधाटे असल्याचे स्पष्ट झाले.

शिल्पा नामदेव दुधाटे (रा. नेहरुनगर, परभणी) असे हत्या करण्यात आलेल्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. तर नामदेव दुधाटे आणि स्वाती दुधाटे असे आरोपी पती-पत्नीचे नाव आहे. पोलीसांना माहिती मिळाल्यानुसार, या दोघांचे भांडण झाले. भांडणात दोघांनी दुसऱ्या पत्नीचा खून केला. तीचा मृतदेह कालव्यात फेकला.