Sachin Tendulkar's security guard shoots self : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या; राहत्या घरी डोक्यात गोळ्या झाडून संपवले जीवन
Sachin Tendulkar (Photo Credit - Twitter)

Sachin Tendulkar's shoots self : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. प्रकाश कापडे यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारून आत्महत्या केल्या. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या सुरक्षारक्षकाचे जळगाव येथे घर आहे. तेथेच त्याने आत्महत्या केल्याचे एबीपी माझाने दिलेल्या वृत्तातून समोर आले आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसले ती घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अवघ्या काही वेळातच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे सचिन तेंडूलकर चर्चेत आले आहेत.

आठ दिवसांपासून गावी होते

प्रकाश कापडे हे मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून ते सुट्टीवर गेले होते. कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील राहत्याघरी आले होते. गेल्या पंधरा वर्षांपासून ते एस आर पी एफ मध्ये कार्यरत होते. आज पहाटे त्यांनी ही आत्महत्या केली आहे. पोलिस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळी गोळी मारून आत्महत्या केल्यानंतर परिसरात गोळीबाराचा आवाज झाला. त्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेचा पंचनामा सुरू असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.