Gautami Patil Hot Photos | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील काही ग्रामीण तरूणाई मध्ये सध्या गौतमी पाटीलची (Gautami Patil) क्रेझ आहे. नृत्यादरम्यान अश्लील हावभाव करण्यावरून चर्चेत आलेली गौतमी आता पुन्हा एका नव्या प्रकारामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडीयामध्ये सध्या गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ वायरल झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या चेजिंग रूम मध्ये कुणीतरी चोरून हा व्हिडीओ शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी 26 वर्षीय तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देखील दखल घेण्यात आली आहे.

गौतमीच्या सहकारी कडून ही तक्रार दाखल झाली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत. अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे.

“एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील”, असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

पहा ट्वीट

गौतमी पाटीलचा व्हिडिओ खोटं इंस्टाग्राम बनवून त्यावरून शेअर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अज्ञाताने इन्स्टाग्रामसोबत व्हाट्सअपवर देखील तो व्हिडिओ टाकून प्रसारित केला आहे.