RTE Admissions 2022: आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी 29 एप्रिल पर्यंत मुदत वाढ
Education | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यात आरटीई अर्थात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत होणार्‍या 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. यंदा प्रवेश जाहीर विद्यार्थ्यांपैकी 50% प्रवेशदेखील न झाल्याने हा निर्णय आता घेण्यात आला आहे. यामुळे 20 एप्रिल पर्यंत असणारी कालमर्यादा 29 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे.

student.maharashtra.gov.in या वेबसाईयवर यंदाची आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादी जाहीर झाली आहे. 5 एप्रिलपासून त्याच्या प्रवेश प्रक्रियेची देखील सुरूवात झाली आहे. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरी आणि तिसरी यादी प्रसिद्ध केली जाते.

खाजगी विनाअनुदानित शाळांच्या प्रवेश स्तरावरील वर्गातील एकूण 25 टक्के जागा RTE कायद्यांतर्गत सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क भरावे लागत नाही. त्यांच्या शिक्षणाचा खर्च राज्यसरकार कडून दिला जातो. आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज 16 फेब्रुवारी पासून भरता येणार- मंत्री वर्षा गायकवाड .

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या सोडतीमध्ये ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. तर प्रतीक्षा यादीत ६९ हजार ८५९ विद्यार्थी आहेत. आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेत ३६ हजार ५०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत.