पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी ( Journalist Gauri Lankesh)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरूद्ध ट्विट केल्याप्रकरणी राहुल गांधीविरोधात (Rahul Gandhi) आज (4 जुलै) शिवडी कोर्टात (Sewri Metro Politan Magistrate Court) सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणामध्ये संघाच्या कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरून राहुल गांधी, सोनिया गांधी, सीताराम येचुरी यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांच्या विरूद्ध मानहानीचा दावा (Defamation Case) करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. न्यायालयाबाहेर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. 15 हजार रूपयांच्या मुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. राहुल गांधी त्यांच्या ट्विटवर ठाम आहेत. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड आणि नसीन खान हे राहुल गांधी यांच्यासाठी जामीनपत्र देणार आहेत.राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम असून आपण या प्रकरणी आपण दोषी नसल्याचा जबाब त्यांनी नोंदवला आहे.
ANI Tweet:
Maharashtra: Rahul Gandhi arrives at a Mumbai court to appear before it in connection with a defamation case filed against him in 2017 for allegedly linking journalist Gauri Lankesh's murder with "BJP-RSS ideology". pic.twitter.com/L2v76qdBmH
— ANI (@ANI) July 4, 2019
Defamation case filed against Rahul Gandhi for allegedly linking Gauri Lankesh's murder with "BJP-RSS ideology": Rahul Gandhi pleads not guilty. He has been released on Rs 15000 surety amount. Ex MP Eknath Gaikwad has given surety for Rahul Gandhi. pic.twitter.com/QVGlntFi2L
— ANI (@ANI) July 4, 2019
राहुल गांधी यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संघावर टीका करत एक ट्विट केले होते. गौरी लंकेश यांच्या हत्येला राहुल गांधींनी भाजपा आणि संघाच्या विचारधारेशी जोडलं होतं. गौरी लंकेश यांची हत्या सप्टेंबर 2017 साली बेंगलूरू येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून करण्यात आली होती.
राहुल गांधी यांनी कालच कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत नव्या अध्याक्षासाठी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने निवडणूका घ्याव्यात यासाठी आवाहन केलं आहे. आज कोर्टात राहुल गांधींसोबत संजय निरूपम, मिलिंद देवरा उपस्थित आहेत.