कर्जत जामखेड: रोहित पवार हजारोंच्या मताधिक्याने विजयी, भाजपच्या राम शिंदे यांचा दणदणीत पराभव
Rohit Pawar with Sharad Pawar l | (Photo credit: Archived, edited, representative images)

Karjat Jamkhed Assembly Election Results 2019: अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीक काँग्रेस पक्षाचे रोहित पवार (Rohit Pawar) यांचा दणदणीत विजय झाला आहे. भारतीय जनता पक्ष उमेदवार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांना या वेळी मताची आघाडी घेता आला नाही. रोहीत पवार यांना या मतदारसंघातून हजारो इतकी आघाडी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या सरकारमध्ये राम शिंदे हे मंत्री होते. तर, रोहीत पवार हे शरद पवार यांचे नातू तर अजित पवार यांचे पुतणे त्यामुळे दोन्ही नेते हे हायहोल्टेज होते. या लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागण्याचे हेच खरे कारण होते.

दरम्यान, रोहित पवार यांच्या विजय हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने मावळ मतदारसंघातून पराभव झाला होता. या पार्श्वभूमिवर रोहित पवार यांना मतदार कसे स्वीकारतात हे महत्त्वाचे होते. त्यात रोहीत पवार हे मूळचे बारामतीचे. पण, त्यांनी राजकीय लढतीसाठी आपल्या गावापासून अनेक मैल दूर असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवड केली. खरे तर, रोहित पवार यांच्यासाठी ही लढाई अजिबात सोपी नव्हती. कारण, मतदारसंघातील उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार. मंत्री म्हणून राम शिंदे यांनी मतदारसंघात केलेले काम, विरोधी पक्षाकडून मिळालेला तगडा प्रतिस्पर्धी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनसंपर्क, असे विविध मुद्दे रोहित पवार यांच्यासाठी आव्हानात्मक होते. मात्र, दोन वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने काम करत रोहित पवार यांनी या ठिकाणी विजय मिळवला. (हेही वाचा, Satara Loksabha By Election Result 2019: सातारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पिछाडीवर)

रोहित पवार यांच्यासोबतच परळी येथून पंकजा मुंडे - धनंजय मुंडे, बीड येथून जयदत्त क्षीरसागर - संदीप, कोथरुड येथून चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे याही लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.