राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची लेक रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर काल रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. दरम्यान या हल्ल्याबाबत आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना महत्त्वाचे खुलासे देखील केले आहेत. त्यांच्यादाव्यानुसार, हा हल्ला करण्यामागे शिवसेना (Shiv Sena) पदाधिकार्यांचा हात आहे. त्यांनी घाबरवण्यासाठी हा हल्ला केला असला तरीही मी घाबरणार नसल्याचं म्हटलं आहे. हे देखील वाचा: Attack on Rohini Khadse's Vehicle: एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या वाहनावर अज्ञातांकडून हल्ला.
रोहिणी खडसेंनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार, 3 टू व्हिलर वरून 7 जण आले होते. एकाकडे पिस्तुल, एकाकडे तलवार आणि एकाकडे रॉड होता. पिस्तुल असलेल्याने कारचा दरवाजा उघडण्यासाठी त्याचा धाक देखील दाखवला. दरवाजा उघडत नाही हे पाहून रॉड हातात असलेल्याने काचेवर तो मारला. हल्ला करणाऱ्यांमध्ये शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले आहे.
एका महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या तिच्या अंगावर धावून जाणाऱ्या शिवसेनेच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुखाचा जाहीर निषेध.शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुखांच्या मतदारसंघातच महिला सुरक्षित नाही.काल झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे.@ChakankarSpeaks @Dwalsepatil @AUThackeray
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) December 25, 2021
रोहिणी खडसे या चांगदेव मध्ये हळदी समारंभाला गेल्या होत्या. तेथून मुक्ताईनगरकडे परत येताना सूतगिरणी परिसरात चार अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर त्यांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात आसरा घेतला. रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं आहे. 2 दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी ऑडिओ क्लिप जारी केल्या होत्या. त्यातील लोक आणि हल्ला करणारे हे एकच असून ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे व कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.