माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Dr. Manmohan Singh) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर टीका करुन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवले आहे. असे म्हणत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देश रसातळाला जाणे म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले, असा घणाघात थोरात यांनी केला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने पहिल्यांदाच दुहेरी आकड्यात सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली. भारताचा सरासरी विकास वाढीचा दर 7.5% इतका राहिला, असेही थोरात यांनी सांगितले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेल्याची टीका केली होती. या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा जीडीपी, घसरला, औद्योगिक क्षेत्र मंदीत गेले, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करावे लागले. या सर्व गोष्टी पाहिल्या तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालीच देश रसातळाला गेल्याचे दिसते. अमेरिकेच्या एका माजी राष्ट्राध्यक्षांनीही डॉ. मनमोहन सिंह यांचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, डॉ. मनमोहनसिंह बोलतात तेव्हा जग ऐकते, त्यांच्याबदद्ल फडणवीसांनी अशा तऱ्हेचे बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, असा टोलाही थोरत यांनी लगावला.
अच्छे दिन दाखवण्याची स्वप्नं दाखवून नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. परंतू, अच्छे दिन दाखवणे दूरच उलट याच तिमाहीत देशाच्या जीडीपीने दर उणे 23.9% अधोगती दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासदराला उतरती कळाच लागल्याचे पाहायला मिळत आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (हेही वाचा, पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांची मदत घेतली तर बिघडले कुठे? सामना संपादकीयास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर)
काय म्हणाले होते फडणवीस?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक सज्जन व्यकक्ती होते. मात्र, ते पंतप्रधान असताना त्यांचे सरकारवर मात्र कोणतेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांच्या नेतत्वाखाली देश रसातळाला गेला, अशी टीका देवेंद्र फडणीस यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीकरत आहे. जुन्या व्यवस्था मोडून त्यांनी अनेक नव्या व्यवस्था निर्माण केल्या. स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा घेतलेले पंतप्रदान हे संन्यासी योद्धा म्हणून काम करत आहेत, असेही फडणवीस म्हणाले होते.