![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Balasaheb-Thora-380x214.jpg)
शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Saamana Editorial) संपादकीयात काँग्रेस नेते पृथ्वराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याबातब केलेल्या टिप्पणीनंतर राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, सातारा येथून निवडणूक लढवताना पृथ्वीराज चव्हाण यांनी जर शरद पवार यांची मदत घेतली तर, त्यात काय बिघडले? असा सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विधानसभा निवडणूक लढवली होती. एकमेकांच्या ताकदीने आम्ही जिंकलो, हे राष्ट्रवादीही मान्य करते. त्यामुळे मदत होत असेल, हे नक्की. तर त्यात हरकत काय?, असेही थोरात यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षातील जेष्ठ 23 नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले. या 23 जणांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश होता. या पत्रात काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि सक्रीय अध्यक्ष हवा अशी मागणी केली. अर्थात, या पत्रात थेट काँग्रेसचे शिर्षस्त नेतृत्व असलेल्या गांधी कुटुंबीयांवर कोणतीही टीका नव्हती. मात्र, गांधी कुटुंबातील व्यक्ती पद स्वीकारण्यास तयार नसेल तर पक्षातील इतर कोणा नेत्याकडे ही जबाबदारी सोपवावी अशी भावना या पत्रात होती. या पत्राची तातडीने दखल घेतल काँग्रेस वर्किंग कमिटीची एक बैठक पार पडली. या पत्राबाबतच सामना संपादकीयात भाष्य करण्यात आले होते. (हेह वाचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करायला हवे- संजय राऊत)
सामना संपादकीयात म्हटले आहे की, “पृथ्वीराज चव्हाण, मिलींद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेसला कायमस्वरुपी सक्रीय अध्यक्ष हवा, अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी, याची गंमत वाटते.”