Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी दिवशी तारखेनुसार शिवजयंती साजरी केल्यानंतर काल (12 मार्च) दिवशी तिथीनुसार शिवाजयंतीचा सोहळा पार पडला. मात्र यंदा तिथीनुसार शिवजयंती साजरी करतानादेखील या उत्सवाला गालबोट लागलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर आयोजित विशेष कार्यक्रमाची शिवज्योत घेऊन जाताना किल्ल्या परतताना अपघाती मृत्यू झाला आहे. दरम्यान एका गटासोबत आलेला 12 वर्षीय चिमुरडा पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. प्रतिक शिंगोटे असं त्याचं नाव असून तो पुण्याजवळील जुन्नर तालुक्यातील खामुंडी मध्ये राहणारा होता. दरम्यान शिवनेरीवरील कार्यक्रम झाल्यानंतर घरी परत जाताना हा प्रकार घडला. महाराष्ट्रात 365 दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे- राज ठाकरे.

प्रतिक घरी जाताना त्याचा टेम्पो जुन्नर गावाजवळील बनकरफाटा येथे पोहचल्यानंतर तो खाली कोसळला. दरम्यान अपघाताच्या वेळेस टेम्पोचा वेग जास्त असल्याने त्याला जबर दुखापत झाली. दरम्यान अपघातानंतर त्याला नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद ओतूर येथील पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 19 फेब्रुवारीच्या शिवजयंती दिवशी देखील एका तरूणीचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. हडसर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित गड किल्ल्यांच्या साफसफाईच्या कार्यक्रमामध्ये तिने सहभाग घेतला होता. 20 वर्षांची ही तरूणी कड्यावरून कोसळून खाली पडल्याने शिवप्रेमींच्या आनंदावर विरजण पडलं होतं.