महाराष्ट्रात 365 दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे- राज ठाकरे
MNS Leader Raj Thackeray (PHoto Credits-Twitter)

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती तिथीनुसार सर्वत्र साजरी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करत वंदन केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्रात 365 दिवस शिवजयंती साजरी करण्यात यावी असे ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. कारण हिंदू धर्मात सर्व सण हे तारखेप्रमाणे नव्हे तर तिथीनुसार साजरे केले जातात. तर शिवजयंतीचा उत्सव सुद्धा हा तिथीप्रमाणेच साजरा केला पाहिजे असे राज ठाकरे यांनी औरंगाबादेत म्हटले आहे.

शिवजयंतीचा उत्सव नागरिकांनी मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करा पण त्याला गालबोट लागणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. ऐवढेच नाही तर देशात आधीच नागरिकांना रोगराईने ग्रास असले असून त्यात आता कोरोना व्हायरसची भर पडली आहे.तर 12 मार्चला औरंगाबाद येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून राज ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती दिसून आली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ही मनसे नेते अभिजित पानसे यांनी स्पष्ट केले होते.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त CSIA येथे जाऊन शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली. त्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याल हार अपर्ण करुन दर्शन घेतले.