देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti 2020) उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, पुणे (Pune) जिल्ह्यात या उत्साहाला गालबोट लागलं आहे. जुन्नरजवळ असलेल्या हडपसर किल्ल्यावरुन पडून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ही घटना घडली. मृत तरुणी ही मुंबईची रहिवासी असून ती आपल्या मित्रांबरोबर शिवजयंती साजरी करण्यासाठी हडपसर किल्ल्यावर गेली होती. परंतु, या किल्ल्यावरुन पडून तिचा मृत्यू झाला आहे. सिद्धी कामठे, असं या तरुणीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमधील काही जण शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नर जवळील हडपसर किल्ल्यावर आले होते. यातील एका तरुणीचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला. सकाळी 11:30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तिच्या कुटुंबीयांना यांसंदर्भात माहिती दिली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (हेही वाचा - धक्कादायक! 'तू सुंदर नाहीस...' म्हणत होत असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू व नणंदेवर गुन्हा दाखल)
सिद्धी कामठे आज आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शिवजयंती साजरी करण्यासाठी हडपसर किल्ल्यावर गेली होती. मात्र, तिचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवजयंती उत्सवावर विरजन पडलं आहे. तसचे सिद्धी कामठे या मृत तरुणीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर ढासळला आहे.