Mumbai local Updates: मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू
Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

मुंबईत पावसाने (Mumbai Rains) अक्षरशा थैमान घातले आहे. मुंबई शनिवारी रात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रंचड पाऊस कोसळला आहे. परिणामी, शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, काही भागात कमरेइतके पाणी साचले आहे. मुंबई लोकल सेवेलाही (Mumbai Local Trains) याचा फटका बसला आहे. ज्यामुळे आज सकाळपासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ज्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाला असून मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गावरील (Harbour Line) लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वाहतुकीला फटका बसला असून बऱ्याच ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. तसेच मुंबई लोकलच्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यामुळे आज सकाळी सहा वाजल्यापासून लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. ज्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Mumbai Rains: मुंबईत 3 मोठ्या दुर्घटना; चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप येथे भिंत कोसळून एकूण 15 जणांचा बळी

ट्वीट-

महत्वाचे मुंबईत कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळीत भागात भिंत कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईंकाना सरकारकडून आर्थिक सहकार्य केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.