Mumbai Rains: मुंबईत 3 मोठ्या दुर्घटना; चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप येथे भिंत कोसळून एकूण 15 जणांचा बळी
Mumbai Rains (Photo Credits-ANI)

Mumbai Rains: मुंबईत काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई लोकल सेवेसह बस सेवेवर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे. अशातच मुंबईतील विक्रोळी येथे असललेल्या दुमजली इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 3 जणांचा बळी गेल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

एनडीआरफचे डेप्युटी कमांडर आशिष कुमार यांनी असे म्हटले की, आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 5-6 मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे घडली आहे.(Mumbai Local Update: मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे बंद)

Tweet:

तसेच  चेंबूर येथे सुद्धा भिंत कोसळल्याने 11 जणांचा बळी गेला आहे. येथे सुद्धा घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. अद्याप 7 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tweet:

तसेच भांडुप येथे सुद्एधा अमरकोट शाळा परिसरात भिंत कोसळून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे, घराबाहेर  साचलेल्या पाण्याचा निचरा करताना भिंत कोसळून ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, मुंबईत आज सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत झालेल्या दमदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले आहे. तर सांताक्रुज आयएमडी कडून सांगण्यात आले आहे की, 24 तासात 31 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सुद्धा 9 मिमी पाऊस झाला आहे. तर शुक्रवारी 253 मिमी पावसाची नोंद केली आहे.