Republic TV चे डिस्ट्रीब्युशन असिस्टंट VP Ghanshyam Singh यांना मुंबई पोलिसांकडून अटक
Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV)  प्रमुख संपादक अर्नब गोस्वामी (Arnb Gosawami)  यांनी एका इंटिरियर डिझायनर याला आत्महत्या करण्यास प्रोत्साहित करण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आता सद्यच्या घडीला अर्नब गोस्वामी यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली असून त्यांची प्रतिदिनी 3 तास पोलीस चौकशी केली जाणार आहे. याच पार्श्वभुमीवर आता चॅनलचे डिस्ट्रीब्युशन असिस्टंट व्हीपी घनश्याम सिंह 9VP Ghanshyam Singh) यांना आज सकाळी 7.40 वाजता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  अटक केली आहे.

रिपब्लिकन यांच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, शक्तीचा वाईट पद्धतीने वापर करत रिपब्लिक मीडिया नेटवर्क्सचे असिस्टंट वाइस प्रेसिडंट घनश्याम सिंह यांना सकाळी अटक करण्यात आली. तर जसे अर्नब गोस्वामी यांना बेकायदेशीर रित्या अटक केली त्याप्रमाणे घनश्याम यांना ही ताब्यात घेण्यात आले आहे. शेवटी त्यांनी #IndiaWithArnab असा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे.(Anvay Naik Suicide Case: अर्णब गोस्वामी ला Interim Bail देण्यास Bombay High Court चा नकार; कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे आदेश)

दरम्यान, इंटिरियर डिझाइनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना ही 2018 मधील आहे. तर डिझाइनर अन्वय नाईक आणि त्याची आई कुमुद नाईक यांनी मे 2018 मध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणाची कारवाई करत पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोट सुद्धा मिळाली होती. या नोटमध्ये कथित रुपात असे म्हटले होते की, अर्नब गोस्वामी आणि अन्य लोकांनी त्यांना 5.40 कोटी रुपये दिले नाहीत. याच कारणास्तव आर्थिक परिस्थिती ढासळल्याने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले आहे.