Anvay Naik Suicide Case: अर्णब गोस्वामी ला Interim Bail देण्यास  Bombay High Court चा नकार; कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
Arnab Goswami | (Photo Credits: ANI)

बॉम्बे हाय कोर्टाकडून आज (9 नोव्हेंबर) Republic TV चे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) ला अंतरिम जामीन टाळत सेशन कोर्टामध्ये अर्ज करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान अर्णब यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली असून 18 नोव्हेंबर पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज बॉम्बे कोर्टात एस एस शिंदे आणि एम एस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असून कोर्टाने गोस्वामी यांना सत्र न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 4 दिवसांत निर्णय देण्यासही सांगितले आहे. दरम्यान अर्णब गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयामध्ये नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केलेला आहे.

अर्णब यांनी पोलिसांनी केलेली अटक आणि त्यांना दिलेल्या वागणूकीबद्दल तातडीने सुटका व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र आता कोर्टाने त्यांना Section 439 of CrPC अंतर्गत अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.

ANI Tweet

2018 साली झालेल्या अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. 4 नोव्हेंबरला सकाळी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक करून मुंबई मधून अलिबाग मध्ये आणले आणि नंतर त्यांना तळोजा कारागृहात पाठवले आहे.

आज कोर्टाच्या सुनावणी दरम्यान अर्णब यांचे वकील हरिश साळवे यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्यांना कारागृहात ठेवण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांना जामीन मिळावा असा युक्तिवाद केला आहे. मात्र नाईक कुटुंबाच्या वकीलाकडून अर्णब बाहेर आल्यास अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व परिवाराला त्रास दिला जाऊ शकतो असे सांगत त्यांचा जामीन नाकारावा असं म्हटलं आहे.