कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीज बिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील 12 लाख 50 हजार 685 शेतकऱ्यांकडे 10 हजार 841 कोटींची मूळ थकबाकी होती. त्यातील 2644 कोटी 77 लाख रुपये महावितरणकडून निर्लेखनद्वारे सूट, तसेच विलंब आकार व व्याजातील सूटद्वारे माफ केले आहे.
कृषिपंपाच्या वीज बिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील 2644 कोटी 77 लाख रुपये माफ केले आहेत, तर या शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल हजार ३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. आर्थिक संकट गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. (हे ही वाचा Weather Forecast: शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस; पुणे वेधशाळेचा अंदाज.)
या योजनेचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 80 हजार 522 शेतकरी वीज बिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. पुणे परिमंडलातील 12 हजार 754 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. महावितरणच्या कल्याण परिमंडलांतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 11 हजार 402 शेतकऱ्यांनी या अभियानात सहभाग घेत 6 कोटी 66 लाख रुपये वीजबिल भरलं आहे