सध्याच्या सणासुदीच्या दिवसात कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत 209 रूपयांनी वाढली आहे. राजधानी दिल्लीत आजपासून 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत सुमारे 1731.50 झाली आहे. यामुळे बाहेर खाताना खिशावरील ताण वाढू शकतो. दुसरीकडे, महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि डोमेस्टिक पाइप्ड नॅचरल गॅस (DPNG) च्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर सोमवारपासून (2 ऑक्टोबर) लागू होणार आहेत.
एमजीएलने रविवारी केलेल्या घोषणेनुसार, सीएनजीची किंमत प्रति किलोग्रॅम 3 रुपयांनी कमी केली जाईल, ज्यामुळे सुधारित कमाल किरकोळ किंमत (MRP) 76.00 रुपये प्रति किलोग्रॅमवर आणली जाईल. त्याच बरोबर, देशांतर्गत पीएनजीची किंमत 2 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) कमी होईल, सुधारित एमआरपी 47.00 रुपये प्रति एससीएम असेल. यामुळे लाखो सीएनजी वाहन वापरकर्त्यांना मिळाला आहे. यामध्ये चार लाख खाजगी कार मालक आणि ऑटो, टॅक्सी आणि बसेससह सार्वजनिक वाहतूक वाहनांचा समावेश आहे.
पर्यावरणपूरक इंधनावर चालणारी ही वाहने त्यांच्या परिचालन खर्चात लक्षणीय घट पाहतील. या दर कपातीमुळे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील सुमारे 20 लाख कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल जे घरगुती स्वयंपाकासाठी पीएनजी वापरत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या किमतीतील कपातीमुळे नैसर्गिक वायूच्या वापराला केवळ देशांतर्गत क्षेत्रातच नव्हे, तर वाहतुकीतही प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पर्यावणपूरक आणि अधिक किफायतशीर ऊर्जा समाधान मिळण्यास हातभार लागेल.’ (हेही वाचा: राज्यातील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर Aaditya Thackeray यांचा निशाणा; मंत्री Uday Samant यांच्या लंडन-म्युनिक-दावोस भेटीबाबत उपस्थित केले 'हे' प्रश्न)
सध्याच्या किमतीद्वारे महानगर गॅस लिमिटेडच्या सीएनजीमुळे पेट्रोलच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त आणि मुंबई विभागातील डिझेलच्या तुलनेत जवळपास 20% बचत होते. दरम्यान, याआधी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने रक्षाबंधनानिमित्त महिलांना मोठी भेट देत घरगुती सिलिंडरच्या किरकोळ किंमतीत 200 रुपयांची कपात केली होते.