Pune: लग्नास नकार दिल्यास चेहऱ्यावर ऍसिड फेकेल, 45 वर्षीय व्यक्तीची अल्पवयीन मुलीला धमकी; गुन्हा दाखल
(Archived, edited, symbolic images)

देशात एकतर्फी प्रेमातून किंवा सूडबुध्दीतून महिलांवर अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, अॅसिड हल्ल्यात दोषी ठरलेल्या आरोपींना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. यातच पुण्यातील (Pune) येरवडा (Yerawada) येथील गाडीतळ परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून येरवडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हुसेन खान (वय, 45) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पुण्याच्या येरवडा येथील गाडीतळ परिसरातील रहिवाशी आहे. तर, फिर्यादी मुलगीही याच परिसरात राहते. दरम्यान, आरोपीने गेल्या तीन महिन्यांपासून फिर्यादी मुलीला मानसिक त्रास देत आहे. आरोपीने हा येता- जाता फिर्यादी मुलीला प्रपोज करायचा. तसेच तू माझ्याशी लग्न कर, असाही तगादा लावायचा. तुझे वय 18 होऊपर्यंत मी वाट बघतो, असे आरोपी बोलायचा. एवढेच नव्हेतर, तू माझ्याशी लग्न न केल्यास तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकेल, अशीही आरोपीने धमकी दिल्याचे फिर्यादी मुलीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मोहम्मद हुसेनविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे देखील वाचा- Mumbai Shocker: झोपेत असलेल्या पत्नीची दिव्यांग वृद्ध व्यक्तीकडून चाकू भोकसून हत्या

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. कठोर कायदे असूनही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अॅसिड हल्ल्यामुळे मरण पावलेल्या महिलांची संख्या चिंतानजक आहे. अशा हल्ल्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे.