Mumbai Shocker: झोपेत असलेल्या पत्नीची दिव्यांग वृद्ध व्यक्तीकडून चाकू भोकसून हत्या
Murder | Image only representative purpose (Photo Credits: Pxhere)

मुंबई (Mumbai) मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दिव्यांग वृद्ध व्यक्तीने झोपलेल्या पत्नीची चाकू भोकसून हत्या केली आहे. चांदवली (Chandivali) येथील राहत्या घरात ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दिव्यांग वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला मानसिक आजार असल्याचे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी (Deputy commissioner of police Maheshwar Reddy) यांनी सांगितले. (Haryana Shocking: हरियाणात खळबळ! आई-वडील, बहिण आणि आजीची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरूणाला अटक)

कोंडाबाई त्रिमुखे असे मृत महिलेचे नाव असून त्या 77 वर्षांच्या होत्या. त्या त्यांच्या वन रुम किचन घरामध्ये झोपल्या असताना आरोपी शंकर रांगत त्यांच्यापाशी आले आणि चाकू वारंवार भोकसला. या हल्ल्यात महिलेच्या छाती, पोट आणि कंबरेला गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी झालेल्या या घटनेनंतर बुधवारी महिलेचा मृत्यू झाला. (Mumbai Crime: मुंबईत पत्नीची हत्या करून पळून जाण्याचा डाव फसला, इटारसी जंक्शनवर आरपीएफ जवांनानी आवळल्या मुसक्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासूच्या ओरडण्याच्या आवाजाने सूनेला जाग आली आणि तिने हा प्रसंग डोळ्यादेखत पाहिला. त्यानंतर आरोपीला लगेचच अटक करण्यात आली. घराच्या भिंती देखील रक्ताने माखल्या आहेत. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी आरोपीने आपले पाय गमावले होते. तसंच मानसिक आजारामुळे मिळत असलेल्या वागणूकीला आरोपी वैतागला होता. आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असतं, अशी माहिती पवई पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.