बंडखोर आमदार  गुवाहाटी ते मुंबई व्हाया गोवा करणार प्रवास; आजचा मुक्काम Taj Resort & Convention Centre, Goa मध्ये - सूत्रांची माहिती
एकनाथ शिंदे (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात राज्य सरकारला 30 जून दिवशी बहुमत चाचणीला (Floor Test) सामोरे जाण्याचे आदेश आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BS Koshyari) यांनी दिले आहेत. दरम्यान आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे बंडखोर नेते आज गुवाहाटीकडून मुंबईकडे प्रवासाला सुरूवात करणार आहेत. मात्र हे आमदार थेट मुंबईत येणार नसून आजचा त्यांचा मुक्काम गोव्यामध्ये होणार आहे.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदार आज गोव्यामध्ये Taj Resort & Convention Centre होणार आहे. या हॉटेलमध्ये 70 रूम्स बूक केल्या आहेत अशी माहिती आहे. उद्या (30 जून) दिवशी गोव्यामधून थेट विधिमंडळात आमदार हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज गुवाहाटीचं रेडिसन ब्लू हॉटेल सोडण्यापूर्वी हे आमदार कामख्या मंदिराच्या दर्शनाला जाणार आहे. आज संध्याकाळी 4.30 वाजता हे आमदार गोव्यात लॅन्ड होणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी च्या राज्यपालांच्या आदेशाला महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार .

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या 39 शिवसेना आणि अन्य 9 अपक्ष आमदार आहेत. एकनाथ शिंदे गटाने आपलाच गट मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी कामख्या मंदिरात दर्शन घेतले आहे. यानंतर आमदारांना घेऊन उद्या मुंबईत दाखल होऊन आपण बहुमत चाचणीला सामोरं जाणार असल्याची त्यांनी सकाळी दिली आहे.