शिर्डी: कर्नाटक मधील बंडखोर आमदार साई दर्शनाला; युवक कॉग्रेस ने दाखवले काळे झेंडे
Rebel-Congress-JDS-Karnataka-MLAs (Photo Credits: Twitter)

कर्नाटकातील राजकीय नाट्य मुंबईपाठोपाठ आता शिर्डीमध्ये रंगायला सुरूवात झाली आहे. आज (13 जुलै) कर्नाटक मधील कॉंग्रेस आणि जनता दल धर्मानिरपक्ष (JDS) पक्षाचे बंडखोर आमदार शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. आज त्यांनी साई बाबा संस्थानच्या मंदिराला भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. दुपारी चार्टर विमानाने ते शिर्डीच्या साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट विमानतळावर उतरले. त्यानंतर ते मंदिरामध्ये पोहचले. शिर्डी मधील द्वारकामाई मंदिरातील एका भिंतीवर दिसले साईबाबा, भाविकांनी केली मोठ्या प्रमाणात गर्दी (Video)

ANI Tweet

कर्नाटकच्या आमदारांना युवक कॉंग्रसकडून त्यांच्या पक्षाचे झेंडे दाखवण्यात आले तर कार्यकर्त्यांनी युवक ' राहुल गांधी झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळेस त्यांनी बीजेपी पक्षाचा निषेधही केला आहे. तर या बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सचिन तांबे हजर होते.

कर्नाटक राज्याच्या राजकारणात सोमवारी (8 जुलै 2019) मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी (H D Kumaraswamy) यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या 21 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.