शरद पवार यांनी शिवसेना- भाजप ला दिला 'हा' सल्ला; जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ ANI)

सत्ता स्थापनेची कोंडी सुटत नसल्याने रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर, रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल आणि त्यांच्यातील झालेल्या चर्च विषयी सांगताना म्हणाले की शरद पवार हे विरोधी पक्षातच बसणार आहेत.

तसेच त्यानांचयातील चर्च दरम्यान "राज्यातील जनतेने भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असून समंजसपणा दाखवून त्यांनी सरकार स्थापन करावं" असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिला असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

तसेच लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, “भाजपा, शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यांनी सरकार स्थापन करत महाराष्ट्रात स्थिरता येईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी रामदास आठवले यांनी अधिक प्रयत्न करावे असा सल्ला मी दिला आहे. रामदास आठवले यांचं राजकीय पक्षांमध्ये वेगळं स्थान आहे. त्यांनी काही म्हणणं मांडलं तर इतर पक्ष गांभीर्याने दखल घेत असतात,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला

सत्ता स्थापनेची ही कोंडी सुटणार का हे अद्याप कळलेलं नसलं तरी शिवसेना मात्र आपल्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर अजूनही ठाम आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच राज्यपालांच्या भेटीला गेले असून ते 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.