
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कोल्हापुरातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांचे पैसे अडकले आहेत. या ग्राहकांना या बँकेतून पैसे काढण्यास आरबीआयने मनाई केली आहे. शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड (Shankarrao Pujari Nutan Nagari Sahakari Bank, Kolhapur) असे या बँकेचे नाव आहे. ही बँक पाठिमागील काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अखेर काही कारणांमुळे आरबीआयने या बँकेवर निर्बंध घातले आहेत.
आरबीआयने म्हटले आहे की, शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड मध्ये क्लिव्किडीटी ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आरबीआयने लागू केलेले निर्बंध हे किमान सहा महिने असणार आहेत. या काळात आरबीआय बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. या बँकेतील जवळपास 99.88 % खातेदार हे Deposit Insurance and Credit Guarantee Corporation विमा योजनेतंर्गत येतात. बँकेच्या योजनेनुसार खातेधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत विमा कवच लाभते. दरम्यान, आरबीआयच्या निर्णयामुळे बँकेतून पैसे काढण्यावर ग्राहकांना मनाई करण्यात आली आहे. (हेही वाचा, Share Markets: आरबीआयने रेपो दर वाढवताच, शेअर बाजार कोसळला; जाणून घ्या घडामोडी)
दरम्यान, आरबीआयने ग्राहकांना विश्वास दिला आहे की, बँकेवर करण्यात आलेली कारवाई म्हणजे बँक बंद होणार असा त्याचा अर्थ नाही. बँक बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, बँकेला कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यासाठी प्रथम आरबीआयची परवानगी घेणे आवश्यक आहे.