Dhangekar and Jagtap | Twitter

पुण्यामध्ये मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक सार्‍याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. 28 वर्ष भाजपाने राखलेला कसबा विधानसभा या निवडणूकीमध्ये मविआकडे गेला. कसब्यातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत तर चिंचवड मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) भाजपाच्या तिकीटावर विजयी ठरल्या आहेत. आता हे दोन नवनिर्वाचित आमदार यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत. 9 मार्चला दोघांना आमदारकीची शपथ दिली जाईल असं सांगण्यात आले आहे.

रविंद्र धंगेकर हे कॉंग्रेसचे आमदार कसबा विधानसभेतून 11 हजार 40 मतांनी जिंकून आले आहेत. त्यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. तर अश्विनी जगताप या लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी एनसीपीच्या नाना काटे यांच्यावर मात करून जिंकून आल्या आहेत. 2 मार्चला त्यांच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता विधानसभेमध्ये त्यांच्या आमदारकीच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर विधिमंडळाच्या कामकाजामध्ये हे दोन्ही आमदार सहभागी होऊ शकणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर बिनविरोध निवडणूका घेतल्या जातात. पण सध्या मागील काही महिन्यात राज्यात झालेले सत्तांतर आणित्याच्या अनुषंगाने घडणार्‍या अनेक राजकीय घडामोडी यांना पाहता महाविकास आघाडीने भाजपासमोर दंड थोपटत ही निवडणूक अटीतटीची केली. सार्‍याच पक्षांनी जोरदार प्रचार, रॅली काढून उमेदवारांचा प्रचार केला होता. नक्की वाचा: Ravindra Dhangekar met Girish Bapat: विरोध संपला; रविंद्र धंगेरकर यांनी घेतली भाजपा खासदार गिरीश बापट यांची भेट .

9 मार्च दिवशी राज्याचा अर्थसंकल्प देखील मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.