Rat Inside Domino's Pizza Shop in Mumbai: डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेट ओव्हनमध्ये उंदरांचा सुळसुळाट; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर (Watch Video)
Rat Inside Domino's Pizza Shop in Mumbai: PC TWITTER

Rat Inside Domino's Pizza Shop in Mumbai:  सोशल मीडियावर एका तरुणाने मुंबईतील भायखळा येथील डॉमिनोझ पिझ्झाच्या आउटलेटमधील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत डॉमिनोझ पिझ्झाच्या ओव्हनमध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचे त्याने सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा किळसवाना प्रकार पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अपलोड केला आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  (हेही वाचा- खरंच Blinkit, Swiggy Instamart, Zepto आणि BB 10 मिनिटांत करतात वस्तूंची डिलिव्हरी)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भायखळा येथील क्लेअर रोड येथील पिझ्झा ओव्हनमध्ये उंदीर धावताना दिसले. हा क्षण एकाने फौन मध्ये कैद केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर अपलोड केला. ओव्हनमध्ये उंदराचा सुळसुळाट पाहून पिझ्झा खाणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे.  व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याआधी एक्सप्रेसट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये उंदीर जेवत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

पिझ्झा ओव्हनमध्ये उंदीर धावत असल्याचा व्हिडिओ अपलोड करणारा तरुण हा आम आदमी पक्षाचा स्थानिक नेता आहे. अस्लम मर्चंट असं त्याचे नाव आहे. व्हिडिओ सोबत त्याने मुंबई पोलिस, बृहन्मुंबई, FASSAI, अन्न विभागाला टॅग केले आहे. नेटकऱ्यांनी यावर लवकर कारवाई करा अशी मागणी केली आहे. डॉमिनोझनो अद्याप कोणतेही अधिकृत विधान दिले नाही.