Ratan Tata यांचं 'Pet Project' चं स्वप्न अखेर सत्यात उतरलं; मुंबईकरांना मिळणार टाटांचं सुसज्ज पशू रूग्णालय!
Ratan TATA | Instagram

वय हा फक्त आकडा असतो हे रतन टाटा (Ratan Tata) यांनी पुन्हा सिद्ध केलं आहे. स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण करण्याची केवळ जिद्द असावी लागते. रतन टाटांनीही मुंबई मध्ये पाळीव प्राण्यांसाठी हॉस्पिटल सुरू करण्याचं स्वप्न वयाच्या 86 व्या वर्षी आता पूर्ण केलं आहे. आपल्या दानशूरते साठी प्रसिद्ध असलेले उद्योगपती आता मुंबईच्या (Mumbai)  महालक्ष्मी (Mahalaxmi) परिसरामध्ये प्राण्यांसाठी हॉस्पिटल सुरू करत आहेत. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये हे प्राण्यासाठी हॉस्पिटल सुरू होणार आहे. इथे कुत्र, मांजरी, ससे यांच्यावर उपचार मिळू शकतात.

प्राण्यांच्या हॉस्पिटलची ही वास्तू मुंबई मध्ये 2.2 एकर जागेवर उभी राहिली आहे. तर यासाठी सुमारे 165 कोटी खर्च करण्यात आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये 24x7 लहान पाळीव प्राण्यांना उपचार मिळणार आहेत. त्यामध्ये सर्जरी युनिट, ऑपरेशन थिएटर असणार आहे. जनरल, आयसीयू आणि एचडीयू युनिट असणार आहे. तसेच MRI, 2d Eco, एक्स रे, सिटी स्कॅनची देखील इथे सोय असेल.

TOI सोबतच्या exclusive interview मध्ये बोलताना त्यांनी, 'आजकाल अनेकांच्या घरात पाळीव प्राणी हे कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असतात. मी देखील काही प्राणी पाळत असल्याने मला या हॉस्पिटलची गरज काय आहे याची जाणीव आहे.

2017 मध्ये राज्य सरकारसोबत झालेल्या जमिनीच्या करारानंतर नवी मुंबईतील कळंबोली येथे बांधले जाणार होते पण नंतर लोकांची प्रवासाची सोय पाहता मुंबई मध्ये मध्यवर्ती भागात ते हलवण्याचा निर्णय झाला. महालक्ष्मीला हे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर  कोविडचा काळ सुरू झाला आणि पुन्हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला. त्यानंतर दीड वर्षाचा काळ हे हॉस्पिटल बांधण्यामध्ये लागला. 2012 ला टाटा च्या चेअरमॅन पदावरून ते पायउतार झाल्यानंतरच त्यांना हे पशू रूग्णालय सुरू करण्याचे वेध लागले होते. नक्की वाचा: Maharashtra Udyog Ratna Award: महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती Ratan Tata यांना जाहीर .

हे पशुवैद्यकीय रुग्णालय, जे भारतातील सर्वात मोठ्या पशू रूग्णालयांपैकी एक असणार आहे. मुंबईत टाटांनी बांधलेल्या वास्तूंमध्ये हे एक मोठं नाव आता जोडलं जाणार आहे. यापूर्वी टाटा ट्रस्टने टाटा मेमोरियल हॉस्पिटल-भारतातील पहिले कॅन्सर केअर हॉस्पिटल, NCPA, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स-बेंगळुरू बांधले आहेत.