
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.इन्स्टाग्रामवरील मैत्री करणं एका तरुणीला चांगलं भारी पडलं आहे. सोशल मीडियावर मैत्री करून तरुणाने पीडीतेवर बलात्कार केला आणि तीचा व्हिडिओ शुट करून कुटुंबीयांना ब्लॅकमेल करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तक्रारानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा- सावत्र आईने मुलाचा काटा काढला, हौदात फेकून केली हत्या, तुळजापूरातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने सुरुवातीला दोघांशी मैत्री केली होती. शिवा दत्तात्रय सुकासे आणि विकास प्रकास सुकासे असं आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला मैत्री झाली त्यानंतर प्रेमसंबंध जुळून आले.याचा फायदा घेण्यासाठी तरुणीला मित्राने लॉजला घेऊन गेला. तेथे तिची फसवणूक करत बलात्कार केला. त्यानंतर निर्दयीने तीचा अश्लिल व्हिडिओ शुट केला. धक्कादायक म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या कुटुंबावर दबाव टाकून ब्लॅकमेल केले.
पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी ती शहारतील एका वसतिगृहाच राहायची. त्यावेळीस शिवा सुकासे याच्यासोबत मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा घेण्यासाठी प्रेमसंबंध जुळवले. तीला लॉजवर घेऊन गेल्यानंतर बलात्कार केला. दरम्यान शिवाचा भाऊ विकासने तिला पळवून नेले. कुटुंबियानी या घटनेअंतर्गत पोलिसांत तक्रार नोंदवला. त्यानंतर कुटुंबियांना तक्रार मागे घेण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देली.या घटनेनंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक केले आहे.