Rape On Ex Corporator in Pune: पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार; खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करण्याच्या धमकीने 10 लाखही उकळले
Representative Image

महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्या (Pune) सारख्या प्रतिभावंतांच्या शहारात मागील काही महिन्यांत कोयता गॅंगची दहशत प्रकर्षाने समोर आल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेतील एका माजी नगरसेविकेवर (PMC Ex Corporator) बलात्कार (Rape) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रीतून काढलेले काही खाजगी फोटो सोशल मीडीयात वायरल करेन याची धमकी देत या नगरसेविकेवर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पीडीत महिलेने याबाबत पर्वती पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवली आहे. सचिन मच्छिंद्र काकडे असे आरोपीचं नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी काकडे आणि पिडीत नगरसेविका यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्यांचे काही खाजगी फोटोज, व्हिडिओ शेअर करू असे आरोपी पीडीतेला वारंवार सांगत होता. 2017 पासून नगरसेविकेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यामध्ये तिला धमकावून दहा लाख रूपये देखील आरोपीने उकळले आहेत. नक्की वाचा: Mumbai Crime News: प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेचा विनयभंग, रेल्वे कर्मचारी असलेला आरोपी अटकेत .

काही दिवसांपूर्वी आरोपी पीडित महिलेकडे गेला. तू दुसरा विवाह केलास. तुझ्यामुळे माझी बायको मला सोडून गेली म्हणत काकडेने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. आरोपी काकडे च्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पर्वती पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली. सध्या पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे याप्रकरणी तपास करत आहेत.