Mumbai Crime News: मुंबईत (Mumbai) एका 23 वर्षीय महिलेने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका रेल्वे कर्मचाऱ्याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणात नवघर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीने सोमवारी तक्रार दिली होती. तरुणी मुलुंड पुर्व येथे राहणारी आहे. सागर जैस्वाल असं आरोपीचे नाव आहे. 2021 पासून दोघांमध्ये मैत्री सुरु झालीय त्याने पीडीतेला कामाच्या ठिकाणी विनयभंग केल्याचे तक्रार केली आहे. आरोपीवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी कामानिमित्त अंधेरी या ठिकाणी राहत होता.
पीडितेने पोलीसांत सांगितल्या प्रमाणे, दोघेही मांटुगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मध्य रेल्वेमध्ये शिकत असताना भेटले. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने पीडितेला अविवाहित असल्याचे सांगितले. आरोपीने पीडित तरुणीसोबत विवाहित जोडप्यासारखा राहण्याचा आग्रह धरला. पीडितेने होकार दिला पण नंतर आरोपी विवाहित असल्याचे आढळून आले. त्यानंतर लगेचच, पीडितेने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले परंतु आरोपीने तिला फोन कॉल्स आणि टेक्स्ट मेसेजद्वारे आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी तिला छेडले.
तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिची कामावर बदनामी करण्याची धमकी दिली. तिने नंतर काम सोडले तरीही हे चालूच होते. 24 सप्टेंबर रोजी पीडिता तिच्या घरी असताना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जयस्वाल जबरदस्तीने तिच्या घरात घुसला. त्याने तिला तीला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तीने नकार दिला. आरोपीने तीच्यावर लैंगिक छळ केला. आणि तिला धमकावले, “तो म्हणाला की तो त्याच्या गावी एक चॉपर आणि रायफल आणेल आणि तिला ठार करेल,” महिलेने पोलिसांना सांगितले. सीआर येथे कायमस्वरूपी कर्मचारी असलेल्या जयस्वाल याला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली.