स्टिरिंगनवरील हात निसटला तर, अपघात होऊ शकतो; भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीला टोला
Raosaheb Danve And Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचे स्टिअरिंग नेमेक कोणाकडे आहे? हा विषय महाराष्ट्रातील राजकारणाचा सर्वात चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये दिलेल्या मुलाखातीवरून स्टिअरिंगवरील चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टिअरिंग हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. तर, तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असे सांगत आहे. दोघांच्या हातात स्टिअरिंग असल्यामुळे ही गाडी झाडावर आदळणार आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे राज्य सरकारवर टोला लगावला आहे.

नुकतीच रावसाहेब दानवे यांची औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद पार पडली आहे. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टिअरिंग हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. तर तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगत आहे. दोघांच्या हातात स्टिअरिंग असल्यामुळे ही गाडी झाडावर आदळणार आहे. एक गाडी आणि चालवणारे दोनजण आहेत. स्टिअरिंग दोघांच्या हातात आहे. महत्वाचे म्हणजे, राज्याच्या कारभाराच्या स्टिअरिंग एकाच्या हातात असले पाहिजे. दरम्यान, स्टिरिंगनवरील हात निसटला तर, कधी अपघात होऊ शकतो, असे दानवे म्हणाले आहेत. तसेच त्यांच्याकडे लायसन्स आणि इन्शुरन्सही नाही, अशीही टिका त्यांनी केली आहे. हे देखील वाचा- वसई पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलनप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस

आज कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद आणि उपबाजार पेठ करमाड ता.जि. औरंगाबाद च्या विविध विकास कामांचे लोकार्पण केले. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज अनावरण केले आहे. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.हरिभाऊ बागडे नाना हे होते तर यांच्या सह सर्व भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनीधी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.