Rama Navami 2019: आज रामनवमी निमित्त उत्साह दिसून आला. तसेच ठिकठिकाणी रामाच्या मंदिरात पूजा आरतीचे आयोजन करताना दिसून आले. तर अनेकांनी रामाचा आशीर्वाद घेत आपल्या इच्छा व्यक्त केल्या. भाविकांनी सुद्धा मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगाच रांग लावल्याचे दिसून आले.
नागपूर (Nagpur) येथील पोद्दारेश्वर मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितिन गडकरी यांनी राम नवमी निमित्त उपस्थिती लावली होती. त्यावेळी तमिळनाडुचे राज्यपाल श्री बनवारीलाल पुरोहित यांच्यासह पूजा करताना दिसून आले. पूजा केल्यांतर शोभायात्रेचे सुद्धा आयोजन करण्यात आले. तेव्हा फडणवीस आणि गडकरी यांनी रथ खेचून शोभायात्रेची शान वाढवली. तसेच भाविकांची गर्दीसुद्धा त्यावेळी दिसून आले. नागपुरात राम नवमीच्या दिवशी शोभायात्रा काढण्याची परंपरा खुप वर्षांपासून सुरु आहे.
नागपुर के पोद्दारेश्वर राम मंदिर में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस और तामिलनाडु के राज्यपाल श्री बनवारीलाल पुरोहित जी के साथ पूजन कर के और राम रथ को खींच कर शोभायात्रा की शुरुआत की। 54 सालों से नागपुर में रामनवमी के दिन शोभायात्रा निकालने की परंपरा है#RamNavami#Nagpur pic.twitter.com/v9cdiLbtIY
— Chowkidar Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 13, 2019
चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे ‘राम नवमी’ (Rama Navami) देशभरात चैत्र शुद्ध नवमी दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते. या दिवशी राम भक्त दुपारी बारा वाजता राम मंदिरा मध्ये राम जन्म उत्सव साजरा करतात. या दि वशी काही जण केवळ दिवसभर उपवास करतात तर काही जण केवळ रामाचे दर्शन घेतात.